बाणेर : सुस रोड बाणेर येथील कचरा प्रकल्प बंद करण्याबाबत कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. या आदेशानुसार प्लांटची पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रकल्पामधील त्रुटी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या व जोपर्यंत त्रुटी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रकल्प बंद करण्याची मागणी सुस रोड बाणेर विकास मंच तर्फे यावेळी करण्यात आली.
सुस बाणेर गार्बेज प्लांट बाबत नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी हा प्लांट बंद व स्थलांतरित का झाला नाही असा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काल जाब विचारला होता व त्याबद्दल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी माहिती दिली व सर्वोच्च न्यालयाने सांगितलेल्या काही अटी व शर्ती ची पूर्तता केल्यास हा प्रकल्प चालू ठेवता येईल असे म्हटले होते. परंतु अवघ्या काही अटींची पूर्तता करण्यात आली असून पूर्ण प्रकल्प हा बंदिस्त करून सर्व बाजूने दहा फुटी झाडी लावण्याची आहे. तसेच राज्य सरकारने संपूर्ण बीडीपी क्षेत्र हे घनदाट जंगल वाढवायचे आहे. तसेच वेस्ट हे जमिनी वर स्पर्श न करता वरचेवर उचलणे साठी स्पेसिफिक टेक्नॉलॉजी सांगितले आहे. रिजेक्ट क्षेत्र व्यापण्यासाठी शेड बांधण्याचे निर्देश हे सर्व ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत करावयाचे होत ते सर्व अपूर्ण आहे.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय उपायुक्त, पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी तसेच कचरा प्रकल्पाचे संचालक व नागरिक यांच्यामध्ये बैठक झाली. नागरीकांनी गार्बेज प्लांट मुळे दुर्गंधी व इतर अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश देखील पाळण्यात आले नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
हा कचरा प्रकल्प उतारावर/टेकडीवर आहे जिथे वाऱ्याचा दाब खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे परिसरात लांब पर्यंत सतत दुर्गंधी पसरत असते.पूर्वी सुद्धा ह्या प्लांट च्या भरपूर तक्रारी केल्या त्या वेळेस “केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ”, NEERI यांनी २-३ वेळा प्रकल्पाला भेट दिली आणि काही गोष्टी सुचवल्या,परंतु त्यांच्या उपायांसह काहीही झाले नाही आणि वायू प्रदूषणाच्या मुख्य समस्येचे निराकरण करण्यात सर्व पर्याय अयशस्वी ठरले.
गार्बेज प्लांटच्या पश्चिमेची जागा हि श्री. ज्ञानेश्वर तापकीर ह्याच्या मालकीची असून महानगरपालिका त्यांची जागा बांधकाम करून अनाधिकृत व बेकायदेशीर रित्या वापरत आहे.
गार्बेज प्लांट चे सर्विस रोड वरील चेंबर वारंवार फुटणे/चोक-अप होणे त्यामुळे रोड वर खराब दूषित पाणी साचून राहणे, त्या मुळे परिसरात रोग-राई पूरक वातावरण. ओला कचरा/लीचेट ओव्हर लोड कचरा ट्रकमधून रस्त्यावर सांडतो ज्यामुळे निसरड्या रस्त्यावर अपघात होतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लघन महानगर पालिकेने कसे केले आहे, हे ही नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकाचे सर्व म्हणणे ऐकून हे सर्व वरिष्ठां पर्यंत पोहोचवू व परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगीतले. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर हा प्रकल्प बंद करण्यात या की पालिका प्रकल्प सुरूच ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.