शहर काँग्रेसच्या वतीने मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भरपावसात तीव्र आंदोलन

 पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तुळशीबाग, जिलब्या गणपती जवळ कुकी व मैतयी या दोन समुदायातील संघर्षानंतर मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात भरपावसात तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकार व मणिपूर सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी अक्षरश: महिला व पुरूष कार्यकर्ते पावसात रोडवर बसून आपला रोष व्यक्त करीत होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘सदर घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेने संपूर्ण भारताची मान शरमेने खाली गेली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ केवळ छत्तीस सेंकद आपले मौन सोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही शेलक्या शब्दात शहराध्यक्षांनी आपला निषेध व्यक्त केला तसेच गेल्या अडिच महिन्यांपासून मणिपूर मधील दंगल थांबवू न शकलेल्या मणिपूरचे मुख्यमंत्री एन विरेन सिंह यांनी सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून त्वरीत राजीनामा द्यावा व देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्रम या आदीवासी समुदायाच्या असताना देखील आदीवासींवर जर देशात अन्याय होत असेल तर त्यांनी सदर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी तीव्र मागणी यावेळी करण्यात आली.’’

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अजित दरेकर, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, रफिक शेख, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सुनिल शिंदे, हनुमंत पवार, अक्षय माने, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, बळिराम डोळे, रविंद्र माझीरे, अजित जाधव, विशाल जाधव, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, राजश्री अडसूळ, सिमा महाडिक, सुंदरा ओव्हाळ, वैशाली रेड्डी, ज्योती चंदवेल, प्रियंका रणपिसे, छाया जाधव, मनिषा ओव्हाळ, रजिया बल्लारी, प्रदिप परदेशी, सतिश पवार, सचिन आडेकर, द. स. पोळेकर, अनिल पवार, भरत सुराणा, दिपक ओव्हाळ, अनिल अहिर, गुलाम खान, राहुल शिरसाट, शिलार रतनगिरी, अमित गोरे, विठ्ठल गायकवाड, स्वप्निल नाईक, सौरभ अमराळे, बाबा सय्यद, सचिन बहिरट, सचिन भोसले, राहुल तायडे, सद्दाम शेख, ॲड. फैय्याज, ॲड. गणेश काळे, ॲड. नंदलाल धिवार, राजू ठोंबरे, वाहिद निलगर, राहुल वंजारी, अविनाश अडसूळ, रवि पाटोळे, सचिन बहिरट, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके, विनोद चौरे,   आदी उपस्थित होते.         आंदोलनास उपस्थितांचे आभार ॲड. राजश्री अडसूळ यांनी मानले.

See also  पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू-पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती