राहुलजी गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकवल्या-
विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन.

पुणे : काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याबाबत गुजरातच्या एका भाजप
नेत्याने मा. गुजरात न्यायालयात बदनामीचा खोट आरोप करत खटला दाखला केला होता या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या
कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने या विरुध्द मा. गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी मा. गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला असून राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अशा या खोट्या मानहानी खटल्यात राहुल गांधी यांना अडकवल्याच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, “भाजपा विरोधात
बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे. राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. मा. राहूल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून ही जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोदी सरकारने विरोधी -पक्ष संपवण्याचे षडयंत्र चालू केले आहे. लोककंत्राची हत्या व पायमल्ली करण्याचे काम सध्या भाजपा सरकार करत आहे.”

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एडवोकेट अभय छाजेड व विकास देशपांडे यांनी निषेधार्थ भाषण केले.

यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर,वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, हाजी उस्मान तांबोळी, नीता रजपूत, लता राजुगरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष प्रदिप परदेशी, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, सुनिल घाडगे, सचिन आडेकर, अशोक जैन, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे, महिला अध्यक्षा पुजा आनंद, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, गुलाम खान, विनय ढेरे, अक्षय जैन, आशुतोष शिंदे, वाहिद निलगर, अविनाश अडसूळ, राज घलोत, रेखा घलोत, वैष्णवी किराड, परवेज तांबोळी, राजेंद्र पेशने,सुंदरा ओव्हाळ, ज्योती परदेशी, सीमा सावंत, घनश्याम निम्हण, श्रीकृष्ण बराटे,दिपक ओव्हाळ, राहुल तायडे, विनोद चौरे, सचिन भोसले, सईदभाई सय्यद,बाबा सय्यद, मुन्ना खंडेलवाल, लतेंद्र भिंगारे, पपिता ओव्हाळ, शारदा वीर,वैशाली रेड्डी, अॅड. राहुल ढाले, ॲड. फैय्याज शेख, अॅड. राजेंद्र काळेबेरे,आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाचे सूत्रसंचालन सुजित यादव केले तर आभार रवि आरडे यांनी केले.

See also  कर्नाटकच्या सभेतून राहुल गांधींचा भाजप वर घणाघात.