“अखिल भारतीय मराठा महासंघ” पुणे शहर वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर तर्फे छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे महानगर पालीका मधील तैलचित्रास मनपा उपायुक्त समाज विकास नितीन उदास व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड केतन कोठावळे, यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला.

यावेळी मराठा महासंघ राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, युवक अध्यक्ष पुणे युवराज दिसले , महिला अध्यक्ष श्रृतिका पाडाळे, मा.बाळासाहेब खैरे, मा. तानाजी शिरोळे इ. मान्यवर उपस्थित होते
ह्या वेळी छत्रपती शाहु महाराज यांची पुस्तक वाटप करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे मनपा उपायुक्त नितीन उदास साहेब यांनी शाहु महाराजांचे विचार मांडले व अॅड केतन कोठावळे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन युवक सरचिटणीस सचिन वडघुले यांनी केले यावेळी भाग्यश्री बोरकर, मिलन पवार, राकेश गायकवाड, गणेश मापारी, रणजित बहिरट, संजय काळे,रुषिकेश पवार, भरत गायकवाड, आकाश रेणुसे इ. पदाधिकारी उपस्थित होते

See also  पुण्यात मनसेची मते कोणाला ?