महसूल व वनविभागाच्या अखत्यारित किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी कार्यवाही हवी -आ.रोहित पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या महसूल व वनविभागाच्या अखत्यारित असलेले किल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

राज्यात सुमारे ४०० गड-किल्ले असून त्यापैकी १२५ किल्ले हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत संरक्षित आहेत तर उर्वरीत किल्ले हे महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत आहेत. या किल्ल्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांची अत्यंत दूरावस्था झाली आहे. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. आपला दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी या किल्ल्यांचं जतन व संवर्धन होणं आवश्यक आहे. त्यामुळं केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयातून या किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती महामहीम राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब यांना केली. त्यांनीही यासंदर्भात योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं.

See also  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार