पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्याहस्ते येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे ध्वज फडकावून ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे, कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री. गुप्ता आणि डॉ. सुपेकर यांच्या हस्ते २६ जानेवारी करीताचे कारागृह विभागातील राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे राष्ट्रपती पदक जाहीर झालेले ९ अधिकारी, कर्मचारी यात तुरुंगाधिकारी श्रेणी-१ रुकमाजी भुमन्ना नरोड, सुनिल यशवंत पाटील, सुभेदार बळीराम पर्वत पाटील, सुभेदार सतिश बापुराव गुंगे, हवालदार सूर्यकांत पांडूरंग पाटील, नामदेव संभाजी भोसले, संतोष रामनाथ जगदाळे, नवनाथ सोपान भोसले, विठ्ठल श्रीराम उगले यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील उपअधिक्षक श्रीमती पल्लवी कदम, बी.एन.ढोले, रविंद्र गायकवाड, मंगेश जगताप, वरिष्ठ तुरुंगधिकारी आनंदा कांदे तसेच कारागृह मुख्यालयातील आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र कारागृह विभागाचा देशपातळीवर सन्मान
गतवर्षी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२३ करिता महाराष्ट्र कारागृह विभागातील ५ अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक तसेच १२ अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झाले होते. त्यामुळे एकूण १७ अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित होण्याचा विक्रम महाराष्ट्र कारागृह विभागात घडला होता. आता २६ जानेवारी २०२४ करिता कारागृह व सुधारसेवेकरिता संपूर्ण भारतात घोषित झालेल्या २७ पदकांपैकी महाराष्ट्रातील ९ अधिकारी कर्मचाऱ्यांना पदके घोषित होऊन महाराष्ट्र कारागृह विभागाचा देशपातळीवर सन्मान झालेला आहे.