अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुसगाव परिसरात ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती

सुसगाव : सुसगाव परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुस गावठाण , सेल पेट्रोल पंप परिसरामध्ये सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सुस गावठाण परिसरात अरुंद रस्त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले वॉर्डन वाहतूक पोलिसांच्या सहकार्य साठी व नागरिकांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

कोणत्याही नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणे तसेच वाहतूक नियोजन सुरळीत होण्यासाठी मदत व्हावी यासाठी हे वॉर्डन कार्यरत राहणार आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नियोजन करत असताना कोणालाही उद्धटपणे बोलणे, शिवीगाळ करणे व मारहाण करणे असे वर्तन टाळण्याच्या सूचना संबंधित वॉर्डनला देण्यात आल्या असल्याचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

See also  एप्रिल महिन्यात १५ दिवस बँकांना असतील सुट्या.