“संशोधनामध्ये ग्रंथालयातील उपलब्ध साधने व संसाधनांचे महत्त्व” या विषयावर परिसंवाद यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये संपन्न

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रिसर्च सेंटर इन सोशल सायन्स आणि यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या वतीने “संशोधनामध्ये ग्रंथालयातील उपलब्ध साधने आणि संसाधनांचे महत्व” या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यास मार्गदर्शक म्हणून राज्याचे सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. विजयकुमार जगताप, आणि एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. सारिका सावंत उपस्थित होत्या.

या परिसंवादामध्ये संशोधनाचा हेतू, अभ्यास क्षेत्राची निवड, संशोधनाचा विषय, तथ्य संकलनांची साधने इत्यादि विषयांवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले, सीईओ दिप्ती नाखाले, दत्ता बाळसराफ, शिक्षण विभागप्रमुख योगेश कुदळे, अनिल पाझारे, भक्ती जांभवडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

See also  गरीबाचा मुलगा आय.ए.एस. होऊ शकतो परंतु प्राध्यापक नाही!