योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘योगीराज भूषण’ पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबरला संपन्न होणार

श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना ‘योगीराज भूषण’ पुरस्कार जाहीर..
बाणेर : बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘योगीराज भूषण’ पुरस्कार व सहकार गौरव पुरस्कार प्रधान समारंभ व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ श्रीमंत छत्रपती संभाजी राजे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक 30 सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता माऊली गार्डन मंगल कार्यालय बाणेर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आणि योगीराज भूषण पुरस्कार घोषित करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, योगीराज भूषण हा पुरस्कार श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना दिला जाणार असून योगीराज विशेष गौरव पुरस्कार वसुंधरा अभियान बाणेर आणि गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्था यांना देण्यात येणार आहे. तसेच सहकार गौरव पुरस्कार बाणेर नागरी पतसंस्था मर्या. बाणेर आणि श्रीराम समर्थ सहकारी मर्या. बाणेर यांना दिला जाणार आहे.

पुढे बोलताना तापकीर म्हणाले की, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे 150 कोटी रुपयांचे मंदिर उभारण्याचे काम श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे चालू आहे त्यासाठी योगीराज पतसंस्थेच्या वतीने पाच लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच योगीराज पतसंस्थेच्या वतीने भंडारा डोंगर येथे उभे राहणाऱ्या मंदिरासाठी एक कोटी रुपयाचा निधी जमा करून देण्याचा संकल्प केला आहे. तरी पतसंस्थेच्या वतीने दानशुरांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान करण्यात येत आहे. इच्छुकांनी श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट या नावाने चेक काढून कार्यक्रमापूर्वी संस्थेत जमा करावा अशी विनंती करण्यात येत आहे.

यावेळी पत्रकार परिषदेच्या वेळी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखा अध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र घाटे, संचालक अमर लोंढे, ॲड. रानवडे, रंजना कोलते, दत्तात्रय गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करापालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश