१ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
0000

See also  कर्तव्यदक्ष कोथरुड पोलिसांचा सर्वांना अभिमान! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दोन्ही जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन