काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

पुणे : काँग्रेस पक्षाला संपूर्ण देशामध्ये सध्या चांगले वातावरण असून भाजपने ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करत आहे. सध्या अनेक राज्याचे अशांततेचे वातावरण आहे राज्य राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापनेचे जे उद्योग सुरू आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भाजप विरुद्ध असंतोष आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे सोडून काँग्रेस पक्षाचे काम केल्यास पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान सहा जागा आपण निश्चित जिंकू असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री विजय वडट्टीवार यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केले.

विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल ऐतिहासिक पुणे काँग्रेस भवनला भेट दिली यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वडेट्टीवार यांचा फुले पगडी,पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, प्रदेश अनुसूचित जाती विभाग व भवानी पेठ ब्लॉक काँग्रेस च्या वतीने ‘भारताचे संविधान देऊन अध्यक्ष सुजित यादव यांनी सत्कार केला यावेळी’ डरो मत ‘ या लोगोच उद्घाटन श्री वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले “डरो मत” हे श्री राहुल गांधी यांचे ब्रीदवाक्य आहे.


सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, माजी आमदार दीप्तीताई चौधरी, सौ संगीता ताई तिवारी, नीताताई परदेशी ,नगरसेविका देवकी शेट्टी, वैशालीताई मराठे, नगरसेवक रफिक शेख, मुख्तार शेख, शहर काँग्रेस हे सर्व पदाधिकारी तसेच ब्लॉगचे सर्व अध्यक्ष महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी विविध सेलचे सर्व प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित दरेकर यांनी केले तर आभार संगीता तिवारी यांनी मानले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित विधानसभा विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेट्टीवार यांचा यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

See also  जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार व देशातील कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मान: औंधच्या अमोल टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार