हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांच्या सुटकेसाठी मुळशीत मोर्चा

मुळशी : हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांच्या सुटकेसाठी मुळशी तहसील कार्यालयावर सकल हिन्दु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
धनंजय देसाई यांनी आपली जमिन बळकावण्याच्या हेतुने मारहाण केली असल्याबाबत प्रदीप बलकवडे या व्यक्तिने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार देसाई यांना अटक झाली आहे.

प्रदीप बलकवडे यांचा ओम साई इंटरप्राईजेस या नावाने जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक जमीनी वर ताबा करून जमिनीच्या व्यवहारात कमिशन घेऊन स्वतःची उपजीविका चालवलेली आहे. बलकवडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर खोट्या केस दाखल करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने कट रचण्यात आला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून तसेच बलकवडे यांचा बोलविता धनी कोण आहे याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली.


धनंजय देसाई यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा प्रशासनाने तपास करून बलकवडे याच्यावर कारवाई करावी व देसाई यांना मुक्त करून जन माणसाचा आदर राखावा. देसाई हे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक असून देव देश आणि धर्म कार्यासाठी, भारत मातेच्या रक्षणासाठी देशात युवकांची मोठी शक्ती त्यांनी निर्माण केलेली आहे. हिंदुराष्ट्र सेना ही देशभरात राष्ट्रभक्तीचे कार्य करते.त्यामुळे त्यांची मुक्तता करून त्यांना योग्य न्याय मिळावा असे निवेदन मुळशी तालुक्याचे तहसीलदार यांना मोर्चादरम्यान देण्यात आले आहे. यावेळी हिंदु राष्ट्र सेनेचे असंख्य कार्यकर्ते, महिला, वारकरी मोर्च्यात सामील झाले होते.

See also  छाजेडजी, तुम्ही तरी काँग्रेसनिष्ठ आहात का?अनिस सुंडके यांचा सवाल