ज्येष्ठ लेखक विचारवंत हरी नरके यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हरी नरके यांचे निधन झाले ते 60 वर्षांचे होते. मुंबईमधील बीकेसी येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हरी रामचंद्र नरके यांचा जन्म १ जून १९६३ ला झाला होता. प्रा. हरी नरके यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे.

महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, हे त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग च्या माध्यमातूनही लेखनात सक्रीय होते.

See also  सहकारी संस्था बळकटीकरणावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील