चांदणी चौकातील उद्घाटनावरून कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली

पुणे : पुण्यातील चांदणी चौकाच्या कामाचे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच निमंत्रण पत्रिकेवर मेधा कुलकर्णी यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. यावरून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी यावरून चंद्रकांत पाटलांवर टिका केल्याने पुण्यातील भाजपचं राजकारण आता  चव्हाट्यावर आलं आहे. त्याचबरोबर त्यांना पुण्यातील केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला देखील पास दिला नसल्याचा आरोप देखील मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून सर्व ठिकाणी चे पास होते. परंतु  राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही पास देण्यात आला नाही. साधे कोथरूड च्या मंडला अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. असं म्हणत त्यांनी यावरूनही नाराजी व्यक्त केली आहे.

  देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे असे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.

See also  भाजपाचे माजी शहरचिटणीस सुनील माने यांनी दिला पक्षाचा राजीनामा