बालेवाडी : बालेवाडी येथील ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणार्या रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यातुन राज्य शासनाने ८ मे २०२३ रोजी बाणेर-बालेवाडी स्मार्ट सिटीच्या सर्व अपुर्ण रस्त्यांच्या कामासाठी १४४ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता. सदर रस्त्याचे काम दोन दिवसांपुर्वी सुरु झाले असुन यावेळी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यासमवेत जागेची पाहणी केली. सदर रस्त्यामध्ये येणार्या झाडांची प्रत्यारोपनाची प्रक्रिया देखिल पुर्ण झाली आहे. लवकरच हा रस्ता पुर्ण करण्यात येणार आहे असे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.
हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा व या रस्त्याच्या माध्यमातुन बाणेर-बालेवाडी परिसरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटावा याकरीता मागिल अनेक वर्षांपासुन मी पुणे मनपा आयुक्त, स्मार्ट सिटी डे.कॅा.चे अधिकारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या च्या माध्यमातुन राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो.
हा रस्ता पु्र्ण करण्यास सर्वात मोठा अडथळा भुसंपादनाचा. या भुसंपादनाकरीता सदर स.नं.२/७/१ अमित बिल्डर्स यांच्या तर्फे श्री.किशोर पाटे तसेच त्यांचे चिरंजिव श्री.रोहन पाटे व पुणे मनपा आयुक्त श्री.विक्रम कुमार याांच्या समवेत दि.२७/०१/२०२२ रोजी बैठक घेवुन प्रश्न सोडवला व ०९/०६/२०२३ रोजी जागेचे भुसंपादन दस्त संबंधित विकसकाने पुणे मनपाला करुन दिला. त्यामुळे प्रलंबित जागेच्या भुसंपादनाचा प्रश्न सुटला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्यक्ष भेटुन या रस्त्याला निधी मिळावा याकरीता लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच १७ मे २०२३ रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत
प्रत्यक्ष जागेवर या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याकरीता पाहणी केली.
हा रस्ता पु्र्ण झाल्याने निश्चितच बाणेर-बालेवाडीकरांची वाहतुक कोंडीतुन सुटका तर होणारच आहे तसेच हिंजवडी आय.टी. पार्क चे कर्मचारी, विद्यार्थी, पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना देखिल या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.