आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील आमदारांनी रस्त्यावर उतरून निषेध करायला हवा होता : सुनील गव्हाणे ; पिंपरी मध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

पिंपरी : आंदोलकांवरील लाठी हल्ला म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मनातील मराठा द्वेष असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड येथे आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे इमरान शेख यांनी केले.

काल जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की , राज्यातील प्रत्येक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या कडून होत आहे. या सरकारने दिव्यांग, वारकरी, विद्यार्थी आणि आता मराठा आंदोलक यांच्यावर पोलिसांकरवी हल्ला करवून हुकुमशाहीचे प्रत्यंतर राज्याला दाखवले आहे. मराठा आरक्षण मागण्यासाठी राज्यभर लाखोंच्या आंदोलन यापूर्वी देखील झाले आहेत परंतु लाखोंच्या संख्येने जमलेले मराठा बांधव यांनी कधी त्या मोर्चाला गालबोट लावल्याचे प्रकार या महाराष्ट्रात घडलेला नाही. काल झालेल्या घटनेसाठी सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून सरकारी यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचे प्रकार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करत असल्याची टीका यांनी इम्रान शेख यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले की, आंदोलकांवर केलेला हल्ला निषेधार्थ आहे. शहरातील आमदारांनी या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे होते. मात्र भाजपा आमदार हे त्यांच्या नेत्यांच्या एवढे दडपणाखाली आहेत की साधा निषेध करायला हि ते धजावत नाहीत. येणाऱ्या काळात शहरातील मराठा समाज याच उत्तर मतदानाच्या माध्यमातुन नक्की देईल.

कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले, महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान , व लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्यावर दडपशाही करण्याचे प्रकार भाजपच्या काळात वाढले असून भाजपा व फडणवीस यांनी सरकारने न टिकणारे मराठा आरक्षण देऊन दिशाभूल केली. कालचे जालना येथील मराठा आंदोलन राज्यात वनवा करणार म्हणून त्यांना भीती आहे त्यामुळेच लाठीचार्ज केला मात्र आता सरकारला राज्यातील जनता माफ करणार नाही –


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या या आंदोलनात विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव, संदीप चव्हाण,अनिल भोसले, शिवाजी पाडाळे, युवक उपाध्यक्ष ओम शिरसागर सरचिटणीस विकास कांबळे रजनीकांत गायकवाड मयूर खरात,अमोल बेंद्रे शाहिद शेख पियूष अंकुश, स्वप्नाली आसोले,बिरुदास मोटे,काशिनाथ जगताप, राजेश हरगुडे,नितीन मोटे,संदीप पाटील,सलीम डांगे,योगेश सोनवणे,हृषिकेश गराडे,विशाल क्षीरसागर,नितीन मोरे,विशाल शिंदे, उज्वला वॉशिंगे,वैभव जाधव,अल्ताफ शेख,संजीवनी पुराणिक,युवराज लोकरे,विशाल शिंदे आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

See also  राज्यात कायदा आणि सुरक्षेचे तीन तेरा आपचा आक्रोश मोर्चा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी