पाषाण येथे पंढरपुरच्या श्री.विठ्ठलांच्या पालखी-रथाचे यंदाचे मानकरी आमले यांच्या बैलजोडीची पुजा संपन्न.

पाषाण : पाषाण येथे पंढरपुरच्या श्री.विठ्ठलांच्या पालखी-रथाचे यंदाचे मानकरी आमले यांच्या बैलजोडीची पुजा संपन्न झाली.
कार्तिकवारी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आलेल्या श्री.पांडुरंगाच्या पालखीरथाला आळंदी ते पंढरपुर सेवा देण्याचा बहुमान मिळालेल्या बैलजोडीची पुजा निम्हण विठ्ठल मंदीर पाषाण येथे समाजभुषण ह.भ.प.श्री.शांताराम महाराज निम्हण व महाराष्ट्रभुषण मृदुंगमहर्षी ह.भ.प.श्री.पांडुरंगआप्पा दातार यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, नितीन निम्हण, प्रसाद निम्हण यांच्यासह सर्वच पाषाणकर भजनी मंडळ, व नामदेवराव भेगडे, निलेशराव आमले, रामचंद्र आमले, ज्ञानोबा भेगडे, बाळासाहेब आमले, संदिप आमले, अजय निम्हण, शंकरराव बवले, अक्षय मते, विशाल नागाळे, विराज माने, आशिष साठे, स्वप्निल चांदेरे, भरत दहिभाते, विष्णु आमले, आदी मान्यवर उपस्थित होते.


मिरवणुकीचे आयोजन समस्त ग्रामस्थ पाषाण, जगदंब गोशाळा पाषाण व समस्त आमलेवाडी क्र.१ व २ चे सर्व युवा कार्यकर्ते व सर्व बैलगाडाप्रेमी व परीसरातील हिंदुत्ववादी यांनी केले होते, यावेळी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस मंगेश निम्हण, मनसे नेते अशोक दळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समिर उत्तरकर, शिवसेनेचे संजय निम्हण,अजय निम्हण,भरत दहिभाते, संकेत तुपे, जगदंब गोसेवा ट्रस्टचे संस्थापक योगेश तुपे, राजे शिवराय प्रतिष्ठाणचे जिल्हाप्रमुख अक्षय भेगडे, शुभमदादा चांदेरे, सनीशेठ येळवंडे, मनसेचे दिनेशदादा आमले, भाजपचे प्रविणशेठ आमले, नवनाथभाऊ ववले, घोटावडे गावचे चेअरमन अभिजीत आमले, युवानेते गिरीषदादा शिंदे, मनसेचे अशोक मराठे खिल्लारप्रेमी रोहित काटे, शुभमशेठ गोडांबे, तसेच पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-सुस भागातील युवकवर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, म्हसोबा प्रतिष्ठाण, शिवशंभो प्रतिष्ठाण, आविनाशशेठ आमले व गणेशदादा भंडालकर मित्रपरीवार या सर्वांचे शिवसेना उद्योग-सहकार सेना जिल्हाप्रमुख व शिवसेना उपशहरसंघटक आशुतोष आमले यांनी आभार मानले. समस्त आमलेपाटिल बैलगाडा संघटनेच्या सर्वच सदस्यांनी शेवट पर्यंत नियोजन पाहुन आनंदद्विगुणीत केला. हडपसरचे भाग्यश्री साऊंड्स व मावळ-सावंतवाडीचे ढोल पथक आकर्षण ठरले.

See also  सुतारवाडी पाषाण परिसरात सर्व पक्षांकडून एकत्र येऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली