जालन्यामध्ये लाठी चार्ज घटनेतील जखमींची खासदार शरद पवार यांनी भेट घेत विचारपूस केली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेत जखमी झालेल्या आंदोलक आणि नागरिकांची अंबड उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व आपल्यासह संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वस्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री आ. राजेश टोपे, बीड जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते, जालना जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, व पदवीधर संघटना अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन