मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला

पुणे: जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर काल शुक्रवार दि. १ सप्टेंबर, २०२३ रोजी मराठा विरोधी भाजपा गृहमंत्र्यांचा आदेशानुसार पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीहल्ला केला.पोलिसांनी महिला, वयोवृध्द नागरिक, लहान मुलांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरला सुद्धा मारहाण केली, मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला. पुणे शहर व पुणे जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

निर्दोष मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या घटनेची सखोल चौकशी करून अत्याचार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या अमानुष लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या मराठा बांधवांना शासनातर्फे भरपाई व आर्थिक मदत करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते तसेच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  महिला सुरक्षेसाठी मोदी सरकार हटवावेच लागेल - सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांचे मत