कोथरूड मध्ये सामुदायिक महा बुद्धवंदना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोथरूड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कोथरूडच्या छ. शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये आंबेडकरी समाज आणि बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मानवतावादी  कार्यकर्त्यांनी  एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


यावेळी प्रास्ताविक करताना कोथरूड भीम  महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,कोथरूड मतदार संघातील वेगवेगळ्या पक्ष , संघटना, आणि संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक हितासाठी समितीच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या या विचारानुसार काम करण्याची जास्त गरज असून दलित कष्टकरी चितांचे हित जपण्याकरता सर्वजण एकत्र आलेलो आहोत. कोणीतरी आपल्यासाठी काही करेल याची वाटी बघण्यापेक्षा आपणच आपल्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. यावेळी कोथरूड मतदार संघातील २८ बुद्ध विहारांचे आधुनिकीकरण व आद्यवतीकरण हा उपक्रम समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे या अभियानाची सुरुवात आज आलेल्या मान्यवर तसेच सर्व समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आली.


सामुदायिक महा बुद्धवंदना या कार्यक्रमासाठी आमदार रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, मा. गजानन थरकुडे, मा. पृथ्वीराज सुतार, मा. डॉ.संदीप बुटाला, मा. राम सोनवणे , मा. स्वप्निल दुधाने, संदीप मोकाटे सचिन धनकुडे पप्पू टेमगिरे संदीप बर्वे मुख्तार मनियार आदी मान्यवर उपस्थित होते. सामुदायिक महा बुद्धवंदना या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले,  बाळासाहेब खंकाळ , दीपक कांबळे,  नामदेव ओव्हाळ ,वसंतराव ओव्हाळ ,राजू गायकवाड, श्रीमती अर्चना चंदनशिवे, सौ. दिपाली चव्हाण, केशव पवळे, संतोष शेडगे मिलिंद कदम, विजय बगडे आदींनी केले होते. यावेळी कोथरूड मतदार संघातील हजारो नागरिक उपस्थित होते.

See also  स्मार्ट सिटी मध्ये  विजेचे वाढीव बिल, छायाचित्र न घेता बिल आकारणी आणि नियमित वीजचा पुरवठा खंडित होत आहे, यावर कारवाई करावी