सुसरोड परिसरातील रस्त्यावरील विविध समस्यांची पाहणी

पाषाण : सुसरोड परिसरातील रस्त्यांवरील विविध समस्यांची पाहणी पुणे महानगरपालिका पथविभाग व वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

यावेळी पथ विभागाचे अभियंता दिनकर गोंजारी, चतुर्श्रुंगी वाहतूक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी, भाजपा शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे,अशोक दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी चौकांमध्ये होत असलेल्या वाहतूक समस्या बाबत, तसेच पार्किंग बाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी तसेच या परिसरातील राडाराडा उचलण्यात यावा. सायकल ट्रॅक चे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे व चौकामधील वाहतुकीला निर्माण होत असलेले अडथळे दूर करण्याच्या सूचना यावेळी नागरिकांनी उपस्थित केल्या.

दरम्यान वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी यांनी चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईनचे पट्टे आखण्यात यावेत तसेच बालाजी मंदिर परिसरात दुभाजक करण्यात यावे अशी सूचना केली.

सुस रोड परिसरातील बेशिस्त पार्किंग व विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासंदर्भात मध्ये यावेळी मागणी करण्यात आली.

यावेळी पथविभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

See also  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न