पुणे महानगरपालिकेच्या निकृष्ट कामाचा पांढरा रंग पंचवटी मधल्या नागरिकांनी पाहिला

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकृष्ट कामाचा पांढरा रंग पंचवटी मधल्या नागरिकांना पाहायला मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पाषाण भागातील पंचवटी परिसरातील रस्त्यांवर पांढऱ्या रंगाचे साईड पट्टे मारण्यात आले होते.
सकाळी रंगवण्यात आलेले रस्त्याचे पांढरे पट्टे संध्याकाळी निघून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदार करत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून यावर कारवाई होणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत असून याचे गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असताना हे खड्डे बुजवण्याचे काम तातडीने होणे आवश्यक असताना अशा पद्धतीची कामे पालिकेच्या माध्यमातून होत आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करून यात भ्रष्टाचार झाला आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली.

See also  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता