औंध, पाषाण, बाणेर गणेश उत्सवासाठी प्रशासन सज्ज ; इथे आहे विसर्जनाची व्यवस्था

औंध : : सगळ्यांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस राहिले असतानाच, उत्सवकाळात स्वच्छता राखली जावी, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडून नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी याठिकाणी एकूण ११ घाट हे गणपती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. तसेच मंडप, प्रकाश व्यवस्था, निर्माल्य टाकण्यासाठी आवश्‍यक कंटेनर, मूर्ती संकलन केंद्र व मूर्ती विसर्जनासाठीचे हौद, लोखंडी टाक्‍या यांसारख्या विविध प्रकारच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. सर्व घाटांची स्वच्छता ही करण्यात आली आहे.

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत नागरिक पुढील ठिकाणी गणपती विसर्जन करू शकतात-
प्रभाग क्रमांक ८
औंध बोपोडी –
महादेव घाट – बोपोडी, शांता आपटे घाट – बोपोडी, राजीव गांधी घाट – औंध , मलिंग घाट (वाघाचा घाट) औंध
प्रभाग क्रमांक ९-
बाणेर घाट ( बाणेर स्मशानभूमी शेजारी), बालेवाडी घाट, सोमेश्वर वाडी घाट ( सोमेश्वर मंदिरामागे), वाकेश्वर घाट पाषाण ( वाकेश्वर मंदिराशेजारी), जयभवानीनगर/ भगवतीनगर घाट (सुतारवाडी रस्ता), जलतरण तलाव (सुतारवाडी), आय टी आय मैदान (सुतारवाडी)
* तर मूर्ती संकलन केंद्राची नावे-
संजय गांधी दवाखाना नवीन इमारत बोपोडी, जेष्ठ नागरिक संघ बोपोडी, माता रमाबाई प्राथमिक विद्यालय बोपोडी,
औंध बाणेर जुने क्षेत्रीय कार्यालय, गोळवलकर
गुरुजी प्राथमिक विद्यालय औंध, इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय औंध, कै .सोपानराव बा. कटके प्राथमिक विद्यालय बाणेर ,
बाणेर आरोग्यकेंद्र प्राइम प्रनाश सोसायटी जवळ, बाणेर डेडिकेटेड हॉस्पिटल बाणेर-१, कै.
बाबुराव गेनुजी बालवडकर प्राथमिक विद्यालय बालेवाडी.
पदमभुषन वसंतदादा पाटील प्राथमिक विद्यालय, सोमेश्वर वाडी पाषाण, संत तुकाराम प्राथमिक विद्यालय सुस रोड, पाषाण जुनी पत्र्याची शाळा , कै.वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय सुतारवाडी, योग भवन सुस रोड पाषाण.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे गाव (नव्याने समाविष्ट केलेले गाव)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुस् गाव (नव्याने समाविष्ट गाव )
तरी याभागातील नागरिकांनी या घाटावर मुर्तीदान किंवा विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी केले आहे.

See also  औंध ग्रामदेवतेचा उत्सव मे महिन्यात