पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली व विविध स्थळांना भेट

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचं शिल्प असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील भक्ती_शक्ती चौकातील शिल्पाला अभिवादन केलं आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या विसाव्याच्या पवित्र स्थळाचे दौऱ्या दरम्यान दर्शन घेतले.


यावेळी भक्ती शक्ती-चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी) दरम्यान कार्यकर्त्यांनी काढलेल्या दुचाकी रॅलीत आमदार रोहित पवार व पिंपरी चिंचवडचे नवीन शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या सह सहभागी झाले.


यावेळी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश कार्याध्यक्ष (युवक) रविकांत वरपे तसेच विविध सेलचे आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड परिसरातील ज्येष्ठ व पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांची यावेळी रोहित पवारांनी भेट घेतली तसेच पिंपरी चिंचवडच्या राजकीय परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. दरम्यान पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधला.

See also  दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार