बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन द्वारा वृक्षारोपण २०२४चा शुभारंभ

बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे २०२१ पासून दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येते. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या मैदानात, अमेनिटि स्पेस मध्ये झाडे लावली जातात. २०२४ च्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा शुभारंभ  चतुःश्रृंगी ट्राफिक पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक पठाण यांचे हस्ते करण्यात आला.

बालेवाडीतील समर्थ लेन मधील अमेनिटि स्पेस वर २९ झाडे लावण्यात आली. यानंतर बालेवाडीत येत्या चार महिन्यांत फेडरेशनतर्फे अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. कार्यक्रमाला वाहतूक पोलीस निरीक्षक पठाण, पुणे महापालिका आरोग्य विभागाचे डॉ. संतोष मुळे, अनेक नागरिक व फेडरेशनचे सदस्य हजर होते. पठाण साहेबांनी फेडरेशनच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.  पुणे महापालिका, स्मार्ट सिटी व परीसरातील सोसायटी पदाधिकारी यांचे सहभागामुळे फेडरेशन तर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. तसेच झाडे जगविण्यासाठी परिसरातील नागरिक पुढे येऊन काम करतात त्याबद्दल सर्वांचे बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे आभार याप्रसंगी मानले गेले.

See also  लवासा गडले येथे बिबट्याचा जिवघेणा हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू .