काँग्रेसने आता तरी राष्ट्रवादीचा नाद सोडायलाच हवा.

पुणे : काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीचा प्रश्न हा केवळ जागा वाटपापुरता उरलेला नाही; तो काँग्रेसच्या राजकीय अस्तित्व, ओळख आणि भविष्यातील ताकदीचा प्रश्न बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा तोच टाळलेला प्रश्न समोर येतो आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मागे चालत राहायचे की स्वतःचा स्वतंत्र राजकीय मार्ग ठामपणे निवडायचा?

राष्ट्रवादीची खरी ताकद काय?
सोप्या शब्दांत सांगायचे तर राष्ट्रवादीची खरी ताकद ही काँग्रेस आहे.राष्ट्रवादीला विरोधी अवकाश, पुरोगामी मतदार आणि संघटनात्मक वैधता काँग्रेसमुळेच मिळाली आहे. हीच स्थिती बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या बाबतीत दिसली.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी जर नितीश कुमारांसाठी दरवाजे कायमचे बंद केले असते, तर नितीश कुमारांना राजकीय अपंगत्व आले असते. नितीश लालूंबरोबर जातील हीच भीती भारतीय जनता पक्ष लाअसायची . म्हणूनच भाजपाने नितीश कुमारांना डोक्यावर घेतले.या निवडणुकीत मात्र त्यांनी ती अनिश्चिता कायमची मार्गी लावली आहे.

तेच सूत्र महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागू पडते. आज राष्ट्रवादीला भाजपाशी ‘निगोशिएट’ करण्याची जी काही ताकद आहे, ती काँग्रेससोबत असण्यामुळे आहे.

जर काँग्रेस ने राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडली, तरी
• काँग्रेसचा फारसा तोटा होताना दिसत नाही,
• उलट राष्ट्रवादीची भाजपाशी सौदेबाजी करण्याची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होते,
• आणि पुढे जाऊन राष्ट्रवादी विरोधी मतांवर दावा करू शकणार नाही.
– विरोधी मते मोठ्या प्रमाणात कॅाग्रेसकडे वळतील.

सत्तेतही आणि विरोधातही हा दुहेरी खेळ खेळणारा राष्ट्रवादी असा एकमेव पक्ष आहे. ही भूमिका कितीही राजकीय चातुर्य म्हणून मान्य केली, तरी याचा सतत तोटा काँग्रेसलाच होतो. काँग्रेसची स्पेस कमी होत जाते आणि शेवटी काँग्रेसच्या हाती काहीच लागत नाही. ना नेतृत्व, ना श्रेय, ना आश्वासक भविष्य.

ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदांपर्यंत,नगरपालिकांपासून महानगरपालिकांपर्यंत काँग्रेसचे संघटन कधी काळी तळागाळात खोलवर रुजलेले होते. ति धग न संपणारी आहे कारण काँग्रेस हा मूळचा संघर्ष करणारा विचार आहे.

असे असले तरी आघाडीच्या राजकारणात काही तडजोडी अपरिहार्य असतात, परंतु तरी त्याची किंमत सतत फक्त काँग्रेसच मोजते. काँग्रेसच्या मतांवर राष्ट्रवादी वाढली; आज तीच राष्ट्रवादी भाजपाच्या मांडीवर जाऊन बसत असेल, तर पुरोगामी व विरोधी मतांवर काँग्रेसचाच नैसर्गिक हक्क उरतो.

See also  लोकशाही दिनामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

सेना–मनसे चालतील, पण राष्ट्रवादी नको असा सुप्त विचार दिसु लागला आहे. एक वेळ शिवसेना किंवा मनसे बरोबर राजकीय समन्वय केला, तरी तो स्पष्ट आणि मर्यादित राहतो.हा भावनिक हट्ट नाही, हा राजकीय निर्णय आहे.भाजपविरोधी लढा जिंकायचा असेल, तर काँग्रेसला आधी स्वतः उभं राहावं लागेल.
“जे होईल ते होईल, पण स्वतंत्र लढा” हा भावनिक उद्गार नाही; तो काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला राजकीय निर्णय आहे.

हा भावनिक हट्ट नाही, हा राजकीय निर्णय आहे.भाजपविरोधी लढा जिंकायचा असेल, तर काँग्रेसला आधी स्वतः उभं राहावं लागेल.
“जे होईल ते होईल, पण स्वतंत्र लढा” हा भावनिक उद्गार नाही; तो काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला राजकीय निर्णय आहे.

काँग्रेसने राष्ट्रवादीचा नाद सोडणं हे धाडस वाटू शकतं, सध्य स्थितीत ते गरजेचे आहे. पण तेच धाडस स्वाभिमानाचं आणि भविष्यातील पुनरुज्जीवनाचं पहिलं पाऊल ठरेल.