महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

पुणे : आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजप चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते श्री. खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,पुणे शहर प्रभारी अमर साबळे,माजी अध्यक्ष जगदीश मुळीक,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती चे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून, सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा,विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

See also  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 'हे' आमदार होऊ शकतात अपात्र -यादी पहा