राज्यात १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार

मुंबई, दि. २७ : राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे.

राज्यात सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषदांमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या दिनानिमित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात यावेत.ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्ताने सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र / परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०९ जुलै २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतूदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

See also  मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्धाटनग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमाची गरज- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील