विद्यापीठ चौक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्याची मनसेची मागणी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पिण्याच्या पाईपलाईन गेली २ ते ३ महिने झाले खराब झाल्याने त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाईप लाईन त्वरित दुरुस्त करण्याचे मनसेच्या वतीने मागणी करण्यात आली.

सदरचे पिण्याचे पाणी थेट रस्त्याने वाहत जात असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पाणी उताराच्या दिशेने भारतीय रिझर्व्ह बँक, स्वातंत्र्यवीर चाफेकर बंधू यांचा पुतळा खैरेवाडी पर्यंत ३ किलोमीटर मुख्य रस्त्याने वाहत जात आहे. त्यामुळे रस्त्यावर शेवाळ होऊन रस्ता निसरडा झाला आहे. ते रस्त्यावर खोलगट भागात जमा होते त्यामुळे या रस्त्यावर वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत.
तसेच येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय व घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना या बाबत तक्रार केली होती. परंतु ते आमच्या हद्दीत नसल्याचे दोन्ही कडील अधिकारी सांगतात व याकडे दुर्लक्ष करतात. सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकापासून २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोमेश्वरवाडी भागात नागरिक पाण्यावाचून वंचित आहे.  सध्या पावसाळ्याचे दिवस संपून उन्हाळ्याचे दिवस सुरु होतील त्यामुळे थोड्या दिवसांनी पाणी टंचाई होऊ शकते जर हेच पाणी जर वाचवले असते तर त्याचा उपभोग नागरिकांना घेता येईल.
तरी येत्या २ दिवसात सदरची पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा होणार अपव्यय थांबवावा. व नागरिकाचे कररुपी पैशांची होणारी हेळसांड थांबवावी.  


  जर येत्या २ दिवसात पाइपलाइनची दुरुस्ती झाली नाही तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात मनसे स्टाईल चक्काजाम आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. याबाबत महापालिका आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी पुणे शहराचे उपाध्यक्ष सुहास निम्हण, छ शिवाजीनगर उपविभागाध्यक्ष संजय तोडमल, शाखाध्यक्ष आयुष्य बोबडे व मनसैनिक उपस्थित होते.

See also  आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीत ७५ किलो वॅट चा सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन