पाषाण : समस्त सुतारवाडी, पाषाण दिंडी क्रमांक ६ चे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यानिमित्त दिंडीचे प्रस्थान पूजन माजी महापौर भाजपाचे राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान दिंडीच्या साहित्याच्या गाड्यांचे पूजन करून पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांना निरोप दिला. तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ४०० रेनकोट आणि मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. आबासाहेब सुतार आणि शिवम सुतार यांनी सालाबाद प्रमाणे या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. या प्रसंगी वारकरी आणि भाविक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.























