औंध : औंध मधील महापालिकेच्या EWS इमारतीत महापालिकेच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये अवैद्य रीतीने राहणाऱ्या भाडेकरून वर कारवाई करण्यात यावी. बेकायदेशीरपणे घुसखोरी करून राहणाऱ्या नागरिकांमुळे तसेच या भागात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. तसेच औंध परिसरात बांगलादेशी नागरिक असल्याची शक्यता व्यक्त करत औंध परिसरातील नागरिकांच्या वतीने चतुशृंगी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्ष विजयानंद पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मागील तीन ते चार वर्षात खून , खूनाचा प्रयत्न , मारहाण , सतत भांडणे, नागरिकांना धमक्या देणे, टवाळखोर मुले घोळक्याने रस्त्यावर बसून महिलांकडे बघून विक्षिप्त हाव भाव करीत असतात , रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर पार्ट्या करणे अशा प्रकारातून येथे गुन्हेगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
तसेच अनधिकृत व्यवसायिक अनोळखी लोकं किंवा बांगलादेशी घुसखोरी याविषयी पोलीस प्रशासन आणि पुणे मनपा यांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गणेश कलापुरे , अभिजित जगताप, संजय मोरे, अरविंद पाटील , रवी व्यवहारे , रोहन रानवडे, वरद तुपकर उपस्थित होते.