समर्थ मित्र मंडळ शिवनगर या ठिकाणी शर्मिला राज ठाकरे यांची नवरात्रीनिमित्त उपस्थिती

सुतारवाडी : समर्थ मित्र मंडळ शिवनगर या ठिकाणी शर्मिला राज ठाकरे यांनी भेट देत आरती केली.

या भेटीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते राजेंद्र बाबू वागस्कर, अजय शिंदे, किशोर शिंदे ,अमोल शिंदे, सुहास निम्हण पांडुरंग सुतार, अशोक मराठे, अनिकेत मुरकुटे, अमित राऊत अभिजीत चौगुले, अशोक दळवी, सचिन सुतार, बाबासाहेब सुतार,हनुमंत खेडेकर, शाखा उपाध्यक्ष विजय ढाकणे, निलचंद्र माने, तानाजी गाडेकर, दशरथ खेडेकर, महिंद्र रणपिसे, संतोष सुतार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मंडळाचे संस्थापक मयूर भगवान सुतार ,अध्यक्ष तानाजी गाडेकर महिला अध्यक्ष राणी खेडेकर व मार्गदर्शक कैलास काटे, इंदिरा सुतार यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मंडळींचे स्वागत केले. शर्मिला ताई यांनी आल्यानंतर देवीची आरती केली व सर्व महिलांशी संवाद साधला. स्थानिक महिलांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या खास करून गेल्या 21 वर्ष मंडळा सोबत असलेल्या शेखभाभींचे ताईंनी खूप कौतुक केले.

See also  जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार