राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत शिष्टमंडळाने मणिपूर मध्ये पीडितांची भेट घेत पाहणी केली.

पुणे : खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत शिष्टमंडळाने मणिपूर मध्ये पीडितांची भेट घेत पाहणी केली.मणिपुर मधील विविध भागात जाऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रेस क्लब ऑफ मणिपुर येथे पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

“मणिपुर मधील अत्यंत दयनीय अवस्था झालेली घरे, जाळपोळ झालेली वाहने, प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले मालमत्तेचे नुकसान अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येथील सर्व लोकांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आलेले आहे. मध्ये पुरेशा प्रमाणात कपडे औषधे व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध नाहीत.
सरकार म्हणून या लोकांच्या पुढे कुठल्याही आशेचा किरण आता राहिलेला नाही. या नागरिकांचे पुनर्वसन असेल किंवा नुकसान भरपाई असेल या संदर्भात सरकार कुठलाही शब्द बोलण्यास तयार नाही, अश्या परिस्थितीमध्ये या लोकांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ येथे स्थानिकांना भेटले. याबत दिल्ली येथे जाऊन खासदार शरद पवार यांना येथील संपूर्ण परिस्थितीची माहिती आम्ही देणार आहोत. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मणिपूर मधील छावण्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात येणार आहेत असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
यावेळी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतील लहान मुले महिला तरुण यांच्याशी संवाद साधला.येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर चॉकलेट्स,खाऊ व राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा,मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष इबोमिया सोराम ,जावेद इनामदार, संदीप बालवडकर, सुषमा सातपुते आदी उपस्थित होते.

See also  ‘पीएस जिओपोर्टल’ निर्मितीमुळे मतदान केंद्र शोधणे झाले सोपेपुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाचा मतदारांच्या सोयीसाठी विशेष पुढाकार