टोलवाल्यांचा झोल उघड,आम आदमी पार्टीची कारवाईची मागणी

पुणे : मे. एमइपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड , आणि राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसी यांच्यात २०१० साली करार करण्यात आला, कायद्यानुसार या काराराची नोंद करून मुद्रांक शुल्क जमा करणे बंधनकारक होते, महाराष्ट्रत ३% टक्के मुद्रांक शुल्क आकारला जातो. तर,सामान्य व्यावसायिक करारांसाठी ०.२ % दराने मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. मुंबई प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यांसाठी झालेल्या २१०० कोटींच्या कराराची ‘टोल करार ‘ म्हणून नोंदणी करून तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क सरकारी तिजोरीत जमा होणे आवश्यक होते . मात्र टोल वसुली करणाऱ्या एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीने टोल कराराला, साधा व्यावसायिक करार भासवत करार केला व कंपनीने ३% ऐवजी ०.२% दराने राज्यसरकारला दिले. या विरोधात आम आदमी पार्टी पुणे शहर वतीने मे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध फसवणूक कलम ४२० चा गुन्हा दाखल करावा व कळ्या यादीत कंपनी चे नाव टाकावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली व २०१० सालापासून आत्तापर्यंतची थकबाकी ती वसूल करून घ्यावी असे निवेदन नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक अधिकारी, पुणे
यांना देण्यात आले.


कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तसेच महसूल ताबडतोब जमा करण्याची मागणी पुणे शहर अध्यक्ष मा.सुदर्शन जगदाळे यांनी केली १५ दिवसाच्या आत कडक कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला.निवेदन वेळी प्रभाकर कोंढाळकर , अक्षय शिंदे, प्रशांत कांबळे , संदेश दिवेकर ,सतीश यादव ,सुरेखा भोसले , अमोल मोरे ,अलीभाई , प्रीतम कोंढाळकर ,मनोज थोरात , व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

See also  खा. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं!- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली