गड किल्ले संवर्धन सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समीर धुमाळ यांची निवड

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या गड किल्ले संवर्धन सेलच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी समीर धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीत महत्वाची भुमिका बजावणारे गड किल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि जतन करणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. हे ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गड किल्ले संवर्धन सेलची स्थापना नुकतीच केली आणि प्रदेशाध्यक्ष पदी कात्रज चे योगेश शेलार यांची निवड केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांनी समीर धुमाळ यांना पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले. धुमाळ हे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार त्यांची जिल्हाध्यक्ष पदासाठी शिफारस केली होती.

गड किल्ले संवर्धनाचे काम अधिक गतीमान होण्यासाठी व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी समीर धुमाळ हे सतत कार्यरत राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी व्यक्त केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गड-किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  झोपेचे सोंग घेतलेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जागे कधी होणार