बाणेर करांची दिवाळी पहाट फुलली ज्योती कळमकर आयोजीत सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने

बाणेर : श्रीनाथ सोशल फाउंडेशन व माजी नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर आयोजित प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा दिवाळी पहाट “गीत रामायण” संगीत कार्यक्रम आज पहाटे ५ वा. भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर, गणराज चौक,बाणेर येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या उपस्थितीत परिसरातील रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळवत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

राष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या अलौकिक शब्द प्रतिमेतून निर्माण केलेली आणि स्वर तीर्थ सुधीर फडके बाबूजी यांनी आपल्या अलौकिक संगीत गायन प्रतिभेतून फुलवलेली गीत रामायण कलाकृती ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर यांनी नागरिकांसाठी आयोजित करत दिवाळी च्या पहाटे सुरमय पर्वणी सर्वांना भेट दिली.

महाराष्ट्राने ज्यांच्या मेरी माटी मेरा देश या अभियानात महाराष्ट्राने केलेल्या रेकॉर्ड साठी प्रयत्न करणारे राजेश पांडे यांनी राज्यभर मेरी माटी मेरा देश विथ सेल्फी साठी फिरत रेकॉर्ड करत महाराष्ट्राचा सन्मान वाढविला म्हणून बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेले ह भ प नितीन निम्हण आणि हभप विश्र्वास कळमकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवीण शिंदे यांची पुणे शहर ओबीसी सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

श्रीधर फडके यांच्या गीत रामायण ऐकणे हे फार मोठे भाग्य आपल्याला गणेश कळमकर आणि ज्योती कळमकर यांनी उपलब्ध करून दिली. इतके सुंदर गीत रामायण नागरिकांना दिवाळी भेट दिली. वेगवेगळ्या उपक्रमातून ते नागरिकांसाठी सतत कार्यरत राहतात : राजेश पांडे( भाजपा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य)

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, स्वप्नाली सायकर, महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, अस्मिता करंदीकर,सुधीर ताम्हाणे,कल्याणी टोकेकर,प्रवीण शिंदे, सागर ताम्हाणे, राहुल पारखे, संदीप वाडकर, नितीन सायकर,महादेव सायकर,गणपत माडगूळकर, बबनराव चाकणकर,अमर लोंढे, डॉ राजेश देशपांडे यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते

See also  "देवू समाजाचं देणं,समाजसेवेने साजरा करू जन्मदिन" असा निर्धार बॅंकिंग क्षेत्रात चाळीस वर्षे सेवा देवून निवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी यांनी केला