कोथरुडमध्ये भाजपाची टिफीन बैठक संपन्न

कोथरूड : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आज कोथरूड मध्ये माजी खासदार प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांमध्ये देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये टिफीन बैठकीच्या माध्यमातून एकत्रित येऊन वैचारिक देवाणघेवाण होते आहे.

भाजपा कोथरुड मंडलाच्या वतीने वृंदावन बॅंक्वेट येथे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर, पुणे शहर प्रभारी तथा माजी खासदार अमर साबळे, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या टिफीन बैठकीत सहभागी झाले होते. प्रत्येकांनी आपापल्या घरातून टिफीन आणून, सर्वांसह जेवणाचा आस्वाद घेतला.

याप्रसंगी नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हे एक कुटुंब आहे. लाखो कार्यकर्त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहे. २०१४ साली देशात माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात एक नवीन पर्व सुरू झाले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजनांमुळे देशातील सर्व जनता माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा काळ सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व म्हणून घोषित केला आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. टिफीन बैठक त्यापैकीच एक असून, टिफीन बैठकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आपापल्या घरून आणलेल्या जेवणाच्या टिफिनमधील पदार्थांच्या देवाण-घेवाणीसह माननीय मोदींजींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करत आहेत. आजचा हा उपक्रम म्हणजे सर्वांसाठी वैचारिक मेजवानीच होती, अशी भावना यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

See also  केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे,शिवाय राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार - खासदार सुप्रिया सुळे

माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी आपल्या नऊ वर्षांच्या काळात गरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम आणि योजना राबविल्या. त्यामुळे गरीब जनतेचे जीवनमान उंचावले आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील लोककल्याणकारी योजना ज्या भागात पोहोचल्या नसतील; त्या भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत‌. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क केला पाहिजे. तसेच, आगामी काळ हा निवडणुकांचा काळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीकोनातून ही तयार राहिले पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.