बहुमानाची मानाची ६५ व्या महाराष्ट्र केसरी किताबाची गदा धाराशिवकडे रवाना

पुणे : स्व.पै.मामासाहेब मोहोळ संकल्पित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही कुस्तीची मातृसंस्था होय . कुस्तीगीर परिषद आणि जिल्हा तालीम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील यांच्या समन्वयातून धाराशिव मुक्कामी 65 वी गादी / माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी किताबाची लढत संपन्न होणार आहे . या स्पर्धेसाठी मोहोळ कुटुंबियांकडून दिली जाणारी बहुमानाची मानाची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा पुजन करुन धाराशिवकडे रवाना करण्यात आली.

श्री श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम जिल्हा क्रीडांगणावर आणि हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या क्रीडानगरीमध्ये दि .16 ते 20 नोव्हेंबर दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मानाची,बहूप्रतिक्षित आणि अनमोल पवित्र किताबाची सन्मानपूर्वक करण्यात आले.

श्री.मा.खासदार आदरणीय अशोकभाऊ मोहोळ, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्यालय सचिव श्री ललित लांडगे ,रुस्तुम – ए -हिंद पै .अमोल बुचडे,हिंदकेसरी अमोल बराटे, राष्ट्रीयपंच चंद्रकांत मोहोळ आदी मान्यवरांच्या हस्ते किताबाचे पूजन झाले.

See also  पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावातील अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या ट्रॅफिक च्या समस्येविरोधात  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे आंदोलन