वारजे : प्रभाग क्रमांक 32 वारजे – पॉप्युलरनगरमधील सर्व पक्षीय उमेदवाराकडून मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया यामध्ये झालेल्या छेडछाडी विरोधात वारजे चौक येथे ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव घोषणा देऊन त्रिव स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.
मतदान दिनाच्या दिवशी मशीनच्या आदलाबदली क्रम तसेच मतमोजणीला मशीन क्रमांक वेगळा आणि प्रत्यक्षात वेगळच मशीन अशा स्वरूपाचा अनुभव आपचे उमेदवार निलेश वांजळे यांनी सांगितला, कर्नाटकच्या धर्तीवर येणाऱ्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपर वरती व्हाव्या असे मत राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन बराटे यांनी व्यक्त केले.
प्रभागात मोठ्या प्रमाणात काम करून सुद्धा नाराजी असून सुद्धा फक्त एकाच पक्षाचे सर्व उमेदवार एवढ्या मताधिक्याने कसे निवडून येतात याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये आश्चर्य आहे असे मत मनसेचे नेते नाना सोनवणे यांनी व्यक्त केले. जर अशा पद्धतीने विरोधक संपवण्याचा घाटच निवडणूक आयोग यांनी घातला असेल तर येणाऱ्या काळात लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असे मत समाजवादी पक्षाचे उमेदवार दत्ता पाकिरे यांनी व्यक्त केले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाबा धुमाळ, किशोर कांबळे, किरण बारटक्के, मनसेच्या वतीने कैलास दांगट, प्रवीण सोनवणे, केशर सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख, समाजवादी पक्षाच्या वतीने विनायक लांबे, दत्ता पाकीरे, वसंत कोळी, यश सोनवणे, आपच्या वतीने सुरेखा भोसले, अभिजीत वाघमारे, स्वप्निल शिंदे, धीरज पाटील, कृष्णा सपकाळ, तसेच अपक्षांच्या वतीने सदामामा शिंदे, दत्ता नेटके, गुणवंत घोडके, सोमनाथ पोळ , कांचन कदम आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.























