पुणे : छत्रपती शिवाजीमहाराज नगर च्या वतीने छत्रपती संभाजीमहाराज उद्यानातील बालोद्यानातील खेळण्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी व नविन अत्याधुनिक खेळणी उपलब्ध करुन देण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला आंदोलनाचे इशारा पत्र देण्यात आले.
तसेच मेट्रोच्या कामामुळे खराब झालेले ओपन जीमचे साहित्य लवकरात लवकर बदलण्यात यावे. तसेच उद्यानातील लहान मुलांची खेळणी दुरुस्त करण्यात यावी व नवीन खेळणी बसवण्यात यावी या मागणीसाठी मुलांच्या हस्ते आंदोलनाचा इशारा देणारे पत्र पुणे महानगरपालिकेचे उद्यान अधिक्षक घोरपडे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराज कर विभाग संघटक अतुल दिघे उपस्थित होते.
पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेच्या सर्वच उद्यानांमध्ये खेळणी जुनाट झाली असून लहान मुलांना या मोडक्या खेळण्यांवर खेळता येत नाही. लहान मुलांच्या व्यथा व मागण्या पुणे महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी अतुल दिघे यांनी लहान मुलांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला निवेदन पत्र दिले.
























