बाणेर मध्ये महाबळेश्वर हॉटेल जवळील 45 एव्हेन्यू बिल्डिंग जवळ गोळीबार एक जखमी

बाणेर : मित्राला कामावरून काढल्याचा राग धरून बाणेर महाबळेश्वर चौक जवळ बंदुकी मधून झालेल्या फायरिंग मध्ये एक जण जखमी झाला असून या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आदित्य दीपक रणवरे व सागर लक्ष्मण बनसोडे रा. बाणेर या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीचा मित्र रोहित याला कामावरून काढल्याचा राग मनात धरून निलेश पिंपळकर याला 45 एवेन्यू बिल्डिंग बाणेर जवळ भेटण्यासाठी बोलवून मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली. या फायरिंग मध्ये आकाश बाणेकर वय 28, राहणार लवळे मुळशी यांच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान पोलिसांनी एक जिवंत काढतूस, दोन खाली केस ताब्यात घेतले असून कलम 307, 506 (2),34, आर्म ऍक्ट 3 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1), सह 135 कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास चतु:शृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

See also  गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे