ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने , क्रिकेट विश्वचषक जिंकला

अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला वनडे विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारताने ६ विकेट्सने गमावला. या विजयासह भारताचे तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे स्वप्न भंगले.

भारताच्या २४१ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅवीस हेडने शतक ठोकले. त्याने १२० चेंडूंत १३७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि १५ चौकार मारले. तसेच मार्नस लाबुशेनने अर्धशतक (५८ धावा) झळकावले. तत्पूर्वी भारताकडून रोहित शर्मा (४७ धावा), विराट कोहली (५४ धावा) आणि केएल राहुल (६६ धावा) यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारताची फलंदाजी कमजोर ठरली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर हेजलवुड आणि कमिन्सनेही २ विकेट्स काढल्या.

See also  मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आप यांची मागणी