26/ 11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

पुणे : २६ / ११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शाहिद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, व निरपराध नागरिक व सीमेवरील शहीद जवानांना पूर्व संध्येला पोलीस मित्र संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

आमदार रवींद्र धंगेकर, पोलीस निरीक्षक शंकर साळुंके, उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस मित्र संघटनांचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते शहिदांना पुष्टचक्र अर्पण करण्यात आले. दामिनी पथक व पोलीस मित्र संघटनांचे पधादिकारी सर्वांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी चंद्रशेखर कपोते, मिलिंद चौधरी, बॉबी करणानी, अंजली तुरारे, ऋतू झा, पोलीस कुटुंबीय, नागरिक व अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

See also  पुणे महानगरपालिकेने ठेकेदारांचे लाड थांबवावे ; आम आदमी पक्षाची मागणी