महापालिकेकडून नवले पूल ते सिंहगड रोड वर अतिक्रमणावर हातोडा

सिंहगड रोड : अतिक्रमण अनधिकृत बांधकाम निर्मूलन व पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम बांधकाम विभाग, सिंहगड रोड वाहतूक पोलीस विभाग व पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत बुधवारी (दि.31) पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे व पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप यांच्या आदेशानुसार नवले पूल ते सिंहगड रोड येथे संयुक्त कारवाई करण्यात आली.

पीएमआरडीए हद्दीमधील अंदाजे एक हजार चौ. फुट व पुणे मनपा हद्दीतील अंदाजे पाच हजार चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. या कारवाई करीता पीएमआरडीए मधील अनधिकृत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता धनंजय झालटे व सिंहगड वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे, पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता विजय कुमावत, कनिष्ठ अभियंता महेश झोमन, मयूर गेडाम, इरफान शेख व विभागीय अतिक्रमण निरीक्षक नारायण साबळे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरूले, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक सागर विभुते, विठ्ठल ओमासे, मंथन आमले उपस्थित होते.

ही कारवाई करिता 2 जेसीबी, 2 ब्रेकर,1 गॅस कटर, 1 बंदिस्त पिंजरा, 2 ट्रक. 20 बिगारी सेवक, यांच्या सहाय्याने  केली आहे.  पीएमआरडीए व पुणे महापालिका यांच्या संयुक्तविद्यामाने  करण्यात आली आहे.

See also  'कार्तिकी वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी' या उपक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन