पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ब्राह्मण समाजातील अनुभवी तज्ञ विचारवंत व सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी जिल्हा पातळीवरील संमेलन सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयात आयोजित केले होते. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे डॉ. गोविंद कुलकर्णी बोलत होते. ते पुढे म्हणाले आपला समाज राजकारणापासून दूर राहिला तर आपल्या समस्या कोण सोडवणार ? सभागृहात आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या समाजाचा सक्रिय सहभाग घ्यायला हवाच.
या मेळाव्यात सुप्रिया बडवे, डॉ. दीपक शिकारपूर, सुनील सावरकर, दैनिक राष्ट्रसंचारचे अनिरुद्ध बडवे, स्पेस/ इस्त्रोचे शास्त्रज्ञ सुरेश नाईक, मिलिंद संपगावकर, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे दीपक करंदीकर, मकरंद टिल्लू, जस्टीस चंद्रचूड, निखिल लातूरकर, कुणाल टिळक, डॉ अभय कुलकर्णी, वंदना धर्माधिकारी, सुधीर दाते (दाते पंचांग), अतुल दाढे, प्रशांत पानसरे, संतोष जोशी आदींनी ब्राह्मण समाजातील समस्या व त्यावर उपाय यावर विचार मंथन केले.
प्रास्ताविक पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मंदार रेडे यांनी केले तर सूत्रसंचालन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन संजय सुपेकरांनी मानले.
यावेळी मकरंद माणकीकर, विश्वनाथ भालेराव, ब्रिजमोहन शर्मा,मनोज पंचारिया , सुनील पारखी, पुष्कर पेशवा (पेशवे वंशज), प्रफुल नेवाळकर (झाशीची राणी वंशज), नितीन फडणीस (सरदार लोहोकरे वंशज), कुंदन कुमार साठे (थोरले बाजीराव प्रतिष्टान), भास्कर गोखले (बाबा आमटे -आनंदवन), डॉ मनीषा खरे, विवेक शेंडे (कंपनी OWNER), सुयोग नरवणे (BBNG), कार्याध्यक्ष सचिन टापरे, तेजस फाटक, लक्ष्मीकांत व धनश्री धडफळे, वृषाली व विजय शेकदार,सुनील शिरगांवकर, कमलेश जोशी, विकास कुलकर्णी, शिरीष टापरे, आकांक्षा देशपांडे, अमृता मेढेकर,अनिता काटे,अमोघ व ऋचा पाठक, प्रसाद गिजरे, राजीव देशपांडे, राजेश सहस्त्रबुद्धे, श्रीकांत क्षीरसागर, किरण काळे,अमेय दिवाण, राहुल करमरकर ,अर्चना जोशी, सानिका खरे, दीपिका बापट, विजय कुलकर्णी, सुधीर मेथेकर, जयश्री घाटे, वेदिका सदावर्ते, पल्लवी गाडगीळ,गौरव कुलकर्णी, विराज जोशी ,स्वराज जोशी ,श्रीपाद कुलकर्णी, संजीव कुलकर्णी तसेच सचिन कुलकर्णी, महेश बारसवाडे, मुकुंद कुलकर्णी, श्री गोवर्धन, राजन बुडूख,आनंद देशमुख, प्रवीण कुरबेत व अनेक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या राजकारणाविषयी अनास्था न दाखवता ब्राह्मण समाजाने राजकारणात सक्रिय व्हायला हवे – डॉ.गोविंद...