कोथरूड मैत्री व्यासपीठ आयोजित सर्वपक्षीय स्नेहमेळाव्यात बहरला मैत्रीचा रंग !

कोथरूड : कर्वेनगर येथे सर्वपक्षीय कोथरूड मैत्री व्यासपीठाच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. अतिशय आनंद आणि स्नेहमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह विचारांची देवाणघेवाण करत, मनमोकळा संवाद साधत, राजकारणापलीकडील असलेल्या आठवणींना उजाळा देत, गप्पांची आणि गाण्यांची अफलातून अशी मैफल रंगली होती. राजकारण करत असताना मैत्रीच्या नात्याची जपणूक करणे आवश्यक आहे. कोथरूड मैत्री व्यासपीठच्या माध्यमातून सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येऊन मैत्रीचे नाते जपत आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

यावेळी मनसे शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर, नितीन शिंदे, गणेश वरपे, गणेश शिंदे, विजय डाकले, नवनाथ जाधव, गोविंद थरकुडे, विशाल भेलके, उमेश भेलके, संदीप मोकाटे, रमेश उभे, किरण उभे, श्रीपाद चिकणे, विठ्ठल बराटे, चेतन भालेकर, प्रशांत हरसूले, दीपक दुधाने, संतोष अमराळे, सचिन मोकाटे, राजाभाऊ जोरी, किशोर सोनार, नंदकुमार गोसावी, योगेश राजापुरकर, किशोर मारणे, गिरीश खत्री, संतोष सुर्वे, तुकाराम जाधव संतोष घारे, संदीप मोरे, योगेश मारणे, वैभव मुरकुटे, तसेच पत्रकार अमोल साबळे, विनायक बेदरकर, जितेंद्र मैड, सागर जगताप, सागर येवले, दीपक पाटील उपस्थित होते.

See also  पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव