पुणे : कुस्ती महर्षी गुरुवर्य देवळाच्या तालमीचे वस्ताद कैलासवासी विठोबा उर्फ आप्पासाहेब मानकर यांच्या २० स्मृति दिनानिमित्त कीर्तन केसरी नवनाथ महाराज यांनी स्थापन केलेल्या नसरापूर माळेगाव येथील माऊली अनाथ आश्रम येथील अनाथ मुलांना रोजच्या जेवणासाठी जे धनधान्य लागतं ते आश्रमात दान करण्यात आले.
यावेळी आप्पांचे सुपुत्र व देवळाच्या तालमीचे वस्ताद श्री विश्वास विठोबा उर्फ आप्पासाहेब मानकर, उपमहाराष्ट्र केसरी दत्तात्रय शिंदे, पांडुरंग भोसले, पांडुरंग बुवा पाटील, शंकरराव खवले, शंकरराव लेकावळे, शांताराम वाडकर ,ज्ञानेश्वर शिंदे, आप्पा आखाडे, संजय श्शिळीमकर, माणिक ढोणे, श्रीरंग तांगडे, राजेंद्र सणस, सचिन मानकर, महादेव भोसले व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
























