अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहर उपाध्यक्ष पदी सुभाषराव ब.ढमाले यांची नियुक्ती

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहर उपाध्यक्ष पदी सुभाषराव ब.ढमाले यांची नियुक्ती नुकत्याच झालेल्या अ.भा.मराठा महासंघाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली.

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या हस्ते सुभाषराव ब ढमाले यांची अ.भा.मराठा महासंघ,पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ” नियुक्ती पत्र”खा देण्यात आले व बैठकीमध्ये दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाचे नेते आणि प्रेरणास्थान स्व. अँड. शाशिकांतजी पवार साहेब यांचा पहिला स्मृतिदिन आहे, याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे येथे अधिवेशन होणार आहे,या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे प्राथमिक नियोजन व रूपरेषे संबंधित बैठक पार पडली.


बैठकीला राष्ट्रिय अध्यक्ष दिलीप जगताप, राष्ट्रिय उपाध्यक्ष संतोष नानवटे, विभागीय चिटणीस दशरथ पिसाळ, युवक प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रदेश उपाध्यक्ष अजय पाटील, युवक प्रदेश संघटक करण रणवीर, महाराष्ट्र प्रदेश युवक संयुक्त सरचिटणीस बाबासाहेब शिंदे ,पश्चिम महा. संपर्क प्रमुख संजय पासलकर, जिल्हा सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप, पुणे शहर सरचिटणीस मयुर गुजर ,पुणे शहर महिला अध्यक्ष सौ आरती मारणे-पवार, पुणे शहर युवक अध्यक्ष मा. मयुरेश पाटिल, पुणे शहर उपाध्यक्ष मा. विनायक मिसाळ, पुणे शहर युवक कार्याध्यक्ष मा. समीर इंदलकर ,युवक उपाध्यक्ष कौस्तुभ भोसले , पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष मा. आकाश कदम, खडकवासला विभाग अध्यक्ष मा. राजेश पोकळे, जयश्रीताई साळुंखे, सविताताई म्हस्के आणि सभासद उपस्थित होते.

See also  पर्यावरणाचे रक्षण -पर्यावरण मित्र  रामदास मारणे यांचा लेख