पाषाण येथे राष्ट्रीय महामार्गावरील विना परवाना फर्निचर मॉल वर कारवाई

पाषाण : पाषाण मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वरील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉल वर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम जमीन दोस्त केले.


सदर बांधकाम हे HEMRL या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे highway वर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवडय़ात उर्वरित दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.


यावेळी jwa कटर मशीन, दोन jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलीस स्टेशन चीफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
सदर कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केली.

See also  ज्येष्ठ लेखक, संशोधक,पुरोगामी विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांना कर्मभूमी हडपसर मध्ये श्रद्धांजली..