बालेवाडी येथील वंशज किओना व चैतन्य प्लाटीनम सोसायटीतील सदस्यांसमवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा संवाद

बालेवाडी : बालेवाडी येथील वंशज किओना व चैतन्य प्लाटीनम सोसायटीतील सदस्यांसमवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष भेटुन संवाद साधला.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्ञानेश्वर(तात्या) बालवडकर, सुकुमार अय्यर, प्रदिप देशपांडे, श्री.पाटील, विनायक विधाते, शंतनु गवंडे, श्री.कोठावडे, निलिमा नगरकर, सौ.करंदिकर, गौरव सिंग, निरज आदबे व दोन्ही सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते.


यावेळी सोसायटीतील सदस्यांनी त्यांना भेडसावत असणार्या रस्ते, कचरा, झाडनकाम यासारख्या समस्या निदर्शनास आणुन दिल्या. यावर तातडीने उपाययोजना करुन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सर्व सभासदांना व सदस्यांना दिले.
यावेळी परिसरातील रस्ते विकास, पाणी पुरवठा, उद्याने, मेट्रो, प्रभागातील मुलभुत सोयी-सुविधा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


तसेच मागील ५ वर्षांच्या कार्यकाळामध्ये या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातुन केलेल्या विविध विकासकामांची तसेच प्रभागातील सर्वच घटकांमधील नागरीकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती उपस्थित नागरीकांना दिली.
यावेळी “अमोल बालवडकर QRT TEAM”च्या माध्यमातुन परिसरात नागरीकांना येणार्या दैनंदिन समस्या तातडीने सोडविण्यात येत असल्याचे सांगत सर्व नागरीकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

See also  राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी